थकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारनं अडचणीतील 32 सहकारी साखर कारखान्यांना 392 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात निम्मे म्हणजे 15 कारखाने हे भाजपच्या नेत्यांचे आहेत. या कारखान्यांना 167 कोटी 36 लाखांची थकहमी मिळाली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे 8, काँग्रेसच्या 6, शिवसेनेच्या 2 आणि अपक्ष नेत्याच्या कारखान्यास ही रक्कम मिळणार आहे.

राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन चांगले आहे. जर कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून राहील आणि नंतर उभ्या ऊसाला भरपाई देण्याची वेळ सरकारवर येऊ शकते. त्यापेक्षा थकहमी देऊन कारखाने सुरू केलेले बरे असा विचार करून राज्य सरकारनं ते कारखाने कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आहेत याचा विचार न करता ही थकहमी दिली आहे.

सर्वाधिक 30 कोटींची थकहमी ही सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील संत दामाजी साखर कारखान्यास मिळणार असून सर्वात कमी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या रेणुकादेवी शरद कारखान्यास 1 कोटी 18 लाख रुपयांची मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल साई साखर कारखान्यास शासनानं थकहमी दिली आहे, पण त्याची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

कारखान्यानिहास कोटींमधील थकहमी –

भाजप – 15

1) शंकरराव कोल्हे, कोपरगाव – 13.66 कोटी
2) श्री वृद्धेश्वर, अहमदनगर – 9.24 कोटी
3) विखे पाटील, अहमदनगर – 22.50 कोटी
4) वैद्यनाथ, बीड – 10.77 कोटी
5) जयभवानी, बीड – 5.60 कोटी
6) टोकाई, हिंगोली – 4.89 कोटी
7) नीरा भीमा इंदापूर, पुणे – 11.90 कोटी
8) किसन वीर भुईंज, सातारा – 15.76 कोटी
9) किसन वीर खंडाळा, सातारा – 7.12 कोटी

राष्ट्रवादी – 8

1) कुकडी, अहमदनगर – 18 कोटी
2) सुंदरराव सोळंके, बीड – 14.47 कोटी
3) रावसाहेब पवार, घोडगंगा, पुणे – 13.63 कोटी
4) मोहनराव शिंदे, सांगली – 9.02 कोटी
5) छत्रपती भवानीनगर, पुणे – 18.75 कोटी
6) बाबासाहेब आंबेडकर, उस्मानाबाद – 8.43 कोटी
7) विठ्ठल, पंढरपूर – 15.10 कोटी
8) संत दामाजी मंगळवेढा – 30 कोटी

काँग्रेस – 6

1) भाऊराव चव्हाण, नांदेड – 12.12 कोटी
2) भाऊराव चव्हाण, हिंगोली – 5.54 कोटी
3) विघ्नहर, पुणे – 24 कोटी
4) राजगड पुणे – 10 कोटी

शिवसेना – 2

1) कुंभी-कासारी, कोल्हापूर – 17.56 कोटी
2) हुतात्मा किसन अहिर, सांगली – 18 कोटी

अपक्ष – 1

रेणुकादेवी शरद कारखाना, पैठण -1.18 कोटी