लोकशाहीची ‘सुपारी’ भाजपने घेतली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील लोकशाहीची सुपारी भाजपने घेतली आहे. राज्यपालांनी पुन्हा एकदा शाहचा ‘हिटमॅन ‘ असल्याचे सिद्ध केले आहे असे सुरजेवाला म्हणाले आहेत.

सुरजेवाला यांनी भाजपवर टीका करतानाच राज्यपालांच्या भूमिकेवरही शंका घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
1) राष्ट्रपती राजवट कधी हटली ?
2) रात्रीतून सत्तास्थापनेचा दावा कसा सादर केला गेला ?
3) आमदारांची यादी कधी सादर केली गेली?
4) आमदार राज्यपालांच्या समोर कधी गेले ?
5) चोरांसारखी शपथ का दिली ?

एकेकाळी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीवर टीका करत होते. सिंचन घोटाळ्याविषयी अजित पवारांवर कारवाईची भाषा करत होते. मात्र त्यांचा पाठिंबा घेऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. याविषयी सुरजेवाला यांनी ट्विट करताना म्हंटले आहे की,

मुझे मत देखो यूँ उजाले में लाकर,
सियासत हूँ मैं, कपड़े नहीं पहनती।

इसे कहते हैं-:
जनादेश से विश्वासघात, लोकतंत्र की सुपारी।

काँग्रेसचे आमदार जेष्ठ नेत्यांवर नाराज –

राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राज्याच्या या परिस्थितीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप आता काँग्रेसचे आमदार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात भाजप वगळून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची संधी आघाडीला होती. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सत्तास्थापनेसाठी खूप उशीर केला. चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याची भावना या काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे.

Visit : Policenama.com