भाजपच्या हातून राज्यातील सत्ता गेल्यानंतर पुणे पालिकेतही झाले ‘हे’ मोठे बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप मोठा पक्ष असतानाही भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. राज्यातील या घडामोडींचा परिणाम राज्यातील महापालिकेत देखील होताना दिसत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे.

पुणे महानगर पालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपी संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. पुणे महानगर पालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सभागृहनेतेपदाची जबाबदारी भिमाले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. भिमाले हे पावणे तीन वर्षापासून या पदावर आहेत. तर कांबळे हे विधानसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघातूनही निवडून आले आहे. तर शिरोळेही आमदार झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत पडझड झाल्याने पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ म्हणाल्या, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपीच्या संचालकांना राजीनामे देण्यास सांगितले असून नवीन पदाधिकारी लवकरच निवडले जातील.

Visit : Policenama.com