11 तारखेला सरकार बनल्यानंतर दाखल होणार कन्हैया आणि शरजीलच्या विरोधात ‘चार्जशीट’ : HM शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा भाजपाचा जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी एकीकडे पीएम नरेंद्र मोदींची दिल्लीच्या द्वारकेत निवडणूक रॅली झाली तर दुसरीकडे दिल्ली कँट सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला संबोधित केले. गृहमंत्री म्हणाले की, दिल्ली सरकार कन्हैया कुमार आणि उमर खालिदच्या विरूद्ध चार्जशीटची परवानगी देत नाही, परंतु 11 तारखेला सरकार बनताच सायंकाळी 6 वाजता चार्जशीट दाखल केले जाईल.

गृहमंत्री म्हणाले, शरजील इमामला अटक करण्यासाठी केजरीवाल यांनी ट्विट केले, आम्ही दुसर्‍या दिवशी अटक केली आणि जेलमध्ये टाकले. मी दहा दिवसांपासून बोलत आहे, परंतु अजून केस चालवण्याची परवानगी मिळालेली नाही. दिल्लीत भाजपा सरकार बनताच एक तासाच्या आत केस दाखल करण्याची परवानगी दिली जाईल.

शाहीनबागचा निर्णय झाला आहे…
ते म्हणाले की, सीएएसुद्धा राहणार नाही आणि सरकारही राहणार नाही. हा मशिदीचा मामला नाही की कोर्टाचा निर्णय झाला आणि आम्ही मान्य केला. शाहीनबागचा निर्णय झाला आहे. निर्णय आम्ही घेतला आहे, आता तो हिंदुस्तान मानेल.

केजरीवाल यांनी भाजपाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या दिलेल्या आव्हानाला उत्तर देताना शहा म्हणाले, केजरीवाल यांनी आज टीव्हीवर म्हटले आहे की सीएम उमेदवार कोण आहे त्यावर चर्चा करू. सीएम उमेदवाराची गरज नाही. मी सांगतो दिल्ली कँटचे उमेदवार मनीश सिंह विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. दिल्लीचा प्रत्येक नागरिक आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे. भाजपा व्यक्ती केंद्रीत नाही.

आपल्या वोटबँकला घाबरत होते…
शहा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल बाबा, केजरीवाल अँड कंपनी कलम 370 हटविण्यास इच्छूक नव्हते, कारण ते वोटबँकला घाबरत होते. आम्ही वोटबँकला घाबरत नाही, देशाचे जिथे भले आहे, ते आम्ही करतो. या निवडणुकीत एका बाजूला शाहीन बागचे समर्थन करणारे राहुल गांधी, केजरीवाल अँड कंपनीची टोळी आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी देशभक्तांची टोळी आहे, असे शहा म्हणाले.