दिल्लीतील भाजप मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एक फोन सकाळी आला होता. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली. हा धमकीचा फोन म्हैसूरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाजपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये आज सकाळी ११ च्या सुमारास एक फोन आला. त्यावेळी फोनवरून दिल्लीतील मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यावेळी पोलिसांनीही मुख्यालयात धाव घेतली. त्यानंतर चौकशी केली. तेव्हा हा फोन कर्नाटकातील म्हैसूर येथून आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गतीने सुरुवात केली आहे. तर फोन करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याचे नाव अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. तर त्याने यापुर्वीही अशा प्रकारे धमकीचे फोन केल्याचे समोर येत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

 

You might also like