ठाकरे कुटूंबियाविरुद्ध पोस्ट लिहिणार्‍या महिलेला भाजपकडूनच ‘जामीन’

पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एका महिलेने आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. याप्रकरणी सुनयना होले विरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. या महिलेला भाजपच्या नेत्यांनी जामीन मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाकरे सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे नेते कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटो हा मौलवी म्हणून व्हायरल करण्यात आला होता. या पोस्टमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सुनयना होले या महिलेला अटक करण्यात आली होती. पण, या महिलेला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. या जामिनामागे भाजपचा हात असल्याचे उघड झाले आहे. दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते तजिंदर पाल बग्गा आणि भाजपचा आयटी सेलचा प्रमुख देवांग दवे यांनी जामिनासाठी या महिलेला मदत केली. खुद्द तजिंदर पाल बग्गा यांनी देवांग दवेला या प्रकरणाला लक्ष घालण्यास सांगितले होते.