आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार ! भाजप तालुकाध्यक्षाचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यावर शिवसेना-भाजपामधील अंतर्गत वादाचे सावट आहे. भाजपाचे पारनेर तालुका अध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

काेरडे म्हणाले की, शिवसेना गेल्या अनेक दिवसांपासून भाजपला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेते. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्यांना सरकारी कार्यक्रमात स्थान दिले जात नाही. त्यांची नावे पत्रिकेवर टाकली जात नाही. तसेच भाजप कार्यकर्त्यांना दुजाभाव दिला जातो. फक्त निवडणूक असल्यावरच भाजपला विचारले जाते.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा कोरडे यांनी इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर अनेक वेळा खासदारांना न विचारता त्यांची नावे पत्रिका टाकली जाते. याबाबत खासदार विखे यांना काही माहिती नसल्याचा आरोपही विश्वनाथ कोरडे यांनी केला आहे. त्यामुळे आता पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाबरोबरच शिवसेना-भाजपचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त