इम्रान खान आणि काँग्रेसच्या भावना वेगळ्या मात्र भाषा एकच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र देखील सुरु आहे. पुलवामा हल्ल्याच्या आठवड्याभरानंतर काँग्रेसने पंतप्रधानांना बेजबाबदार म्हणत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला आहे.

इमरान खान आणि काँग्रेसची भाषा एकच –
पुलवामा हल्ल्यासाठी जम्मू कश्मिरमध्ये आरडीएक्स स्फोटके कशी आली, देशाची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे का असे सवाल काँग्रेस करत आहे. यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘काँग्रेसच्या या विधानांमुळे पाकिस्तानला आनंद होत आहे. पाकिस्तानचे काम काँग्रेसवाले करत आहेत. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि काँग्रेसच्या भावना वेगळ्या असल्या तरी त्यांची भाषा एकच आहे.’

काँग्रेसने पंतप्रधानांवर केलेले आरोप दुर्दैवी-
पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खात बुडालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिस्कव्हरी चॅनेलच्या डॉक्युमेट्रीसाठी जिम कॉर्बेट अभयारण्यात शूटींगमध्ये व्यस्त होते तसेच पंतप्रधान हे असंवेदनशील असून त्यांनी शहिदांना नवी दिल्लीतील विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकारणासाठी एक तास उशीर केल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांवर केलेले आरोप दुर्दैवी आहेत. अशा घटनांचे राजाकारण न करता देश एकजुटीने उभा राहण्याची गरज आहे. असे आवाहन रविशंकर प्रसाद यांनी केले.

काँग्रेस आणि भाजपच्या विचारधारेत फरक-
भाजपने तीन दिवस पक्षाचे कार्यक्रम स्थगित केले होते असे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि भाजपच्या विचारधारेत फरक आहे या गंभीर मुद्द्यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत देश थांबायला नको. देशाची गती रोखण्याचा दहशतवाद्यांचा मनोदय होता. तो आम्ही सफल होऊ देणार नाही. शहिदांचे मृतदेह दिल्लीत आल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोबाईलवर व्यस्त होते. या घटनेचे आम्हालाही राजकारण करता आले असते. मात्र, आम्ही खालच्या दर्जाचे राजकारण करत नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

राहुल गांधी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागतात, मात्र लंडनच्या हॅकरची सत्यता तपासत नाहीत’