‘युती’मुळं इनकमिंगला मर्यादा पण लवकरच भाजपात ‘मेगाभरती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पक्षांतर करत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्राणात इनकमिंग सुरु आहे. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, भाजप-शिवसेना युतीमुळे इनकमिंगला मर्यादा आहेत. मात्र, भाजपमध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. भाजपमध्ये पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये मेगाभरती होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

अनेक जण पक्षामध्ये येण्यास उत्सुक आहेत पण युती असल्याने इनकमिंगला मर्यादा आहेत. भाजपला 240 पेक्षा जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज गिरीश महाजन यांनी वर्तवला आहे. राष्ट्रवादीची स्थिती या निवडणुकीत गंभीर होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या पुढच्या मेगाभरतीमध्ये कोणकोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे याची नावे मात्र सध्या गुलदस्त्यात आहेत.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असून भाजपने स्वबळावर निवडणूक लढवल्यास स्पष्ट बहुमत मिळेल असे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अमित शहा यांनी सोलापूरमध्ये युतीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केल्याने या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like