BJP Jagdish Mulik | शहरातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करावे; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Jagdish Mulik | राज्यात भाजप सत्तेत असताना सुरू केलेल्या योजनांची कामे मागील अडीच वर्षांमध्ये थंडावली आहेत. या कामांना गती मिळावी यासाठी लवकरात लवकर बैठक बोलवावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केल्याची माहीती भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. (BJP Jagdish Mulik)

 

शहरातील नाले सफाई, ड्रेनेज सफाई आदी समस्यांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुळीक यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस गणेश घोष, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक प्रविण चोरबोले हे उपस्थित होते. (BJP Jagdish Mulik)

 

मुळीक म्हणाले, की शहरातील नाले सफाई झालेली नाही. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास अडचणी येउ शकतात. प्रशासनाने तातडीने नाले सफाई करावी यासाठी ड्रेनेज लाईनची सफाई करावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्तांकडे केली. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणं याकडे लक्ष द्यावे. नदी काठी राडारोडा टाकला जातोय. चेंबर्स चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. ही परिस्थिती विदारक आहे. याबाबत देखील काही सूचना केल्या आहेत. चेंबर चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना माजी नगरसेवकांनी केल्या. विक्रम कुमार यांनी देखिल याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुळीक यांनी नमूद केले.

यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहर भाजपच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे.
त्यामध्ये भाजपच्या पुर्वीच्या सत्ता काळात शहरात सुरू केलेल्या नदी सुधार, नदी काठ सुधार, मेट्रो, रिंग रोड यासारख्या प्रकल्पांना मागील अडीच वर्षात ब्रेक लागला आहे.
या प्रकल्पांना गती देण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे मुळीक यांनी सांगितले.

 

अगोदरच्या राज्यातील सत्ताधार्‍यांनी प्रशासनाला हाताशी धरून भाजपच्या माननीयांची कामे होणार नाही,
त्यांच्या विरोधात जनमत तयार होईल या पद्धतीने प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
त्यामुळे पावसाळ्यात शहरातील रस्ते व नाल्यांची परिस्थिती विदारक झाली आहे.
जगदीश मुळीक, भाजप शहर अध्यक्ष.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दोन पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे महापालिका प्रशासनाने मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ केला आहे.
प्रशासनाने हा घोळ दूर करून याद्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणीही यावेळी आयुक्तांकडे केली असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

 

 

Web Title :- BJP Jagdish Mulik | Meetings should be held immediately to expedite pending projects in the city BJP city president Jagdish Muliks demand to Deputy Chief Minister Fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा