BJP Jan Ashirwad Yatra | महाराष्ट्रात BJP ची नवी दुहेरी रणनीती; ‘या’ मंत्र्यावर सोपवली मोदी सरकारने मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतच मोदी सरकारच्या (Modi government) केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये फेरबदल करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 1 कॅबिनेट मंत्रीपदी तर 3 राज्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. हे नव्याने मंत्री झालेले चारही नेते 16 ऑगस्टपासून राज्यातील वेगवेगळ्या भागामधील जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) काढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारचे (Central Government) चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहचविणे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) टीकास्र सोडणे, अशी या जनआशीर्वाद यात्रेची (BJP Jan Ashirwad Yatra) दुहेरी रणनीती असणार आहे. याबाबत माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी दिली आहे.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील असणारे नव्याने मंत्रीपदी वर्णी लागलेले चार नेते म्हणजे केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) हे 4 नवनियुक्त मंत्री जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी सवांद साधणार आहेत. दरम्यान, या यात्रेचे प्रमुख समन्वयक आमदार संजय केळकर (MLA Sanjay Kelkar) असणार आहेत.

केशव उपाध्ये यांनी माहिती देताना सांगितलं आहे की, ‘पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील
यांची जनआशीर्वाद यात्रा 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 570 किलोमीटरची यात्रा काढणार आहेत.
तसेच याच कालावधीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात 431 किलोमीटरची यात्रा काढणार आहेत.
याचबरोबर अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मराठवाड्यात 623 किलोमीटर यात्रा काढणार आहेत.
या दरम्यान, भाजप पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)
आणि खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) या प्रारंभाला सोबत असतील.

दरम्यान, केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांची यात्रा मुंबईमधून 19 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.
ही यात्रा 650 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
दरम्यान, या यात्रेत (BJP Janaashirwad Yatra) चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेऊन.
केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधणार आहेत.

Web Title :-  BJP Jan Ashirwad Yatra | bjps strategy new union ministers start jan aashirvad yatra 16th august

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Court | उच्च न्यायालयाकडून ‘मोक्का’तून बाबा बोडकेसह तिघांची निर्दोष मुक्तता

Pune Crime | ‘दुल्हे राजा’ सिनेमाची कहाणी पुण्यात ! हॉटेल चालकाने टपरीवाल्यावर तलवारीने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Fisheries Business | मत्स्य पालन करून व्हा लखपती, दरमहिना होईल 2 लाखाची कमाई; व्याज फ्री लोन आणि इन्श्युरन्ससह अनेक सुविधा, जाणून घ्या