राहुल गांधींनी CAA वर 10 वाक्य बोलून दाखवावीत, भाजप नेत्याचे ‘आव्हान’ (व्हिडिओ)

इंदूर : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशभरात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक राज्यांत आणि जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने वातावरण अधिकच तापले आहे. याच मुद्यावरून काँग्रेसने देशभरात आंदोलने केली आणि झालेल्या आंदोलनांना पाठिंबा दिला. देशभरात तापलेले वातावरण शांत करण्यासाठी आणि CAA कायद्याबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे.

CAA कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले असल्याने भाजपने देशभर सभा आणि पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारची बाजू मांडणार आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी इंदूरमध्ये आभार सभा घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. जे.पी. नड्डा यांनी घेतलेल्या आभार सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान दिले आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले, काँग्रेस आणि पक्षाचे नेते गैरसमज पसरवून देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. CAA विधेयकाच्या तरतूदी काय आहेत यावर राहुल गांधी यांनी फक्त 10 वाक्य बोलून दाखवावीत, असे मी आव्हान देतो. फक्त लोकांच्या भावना भडकावून मतपेटीचं राजकारण केले जात आहे. व्होट बँकेसाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/