BJP Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा काँग्रेस-शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Keshav Upadhye | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आल्यापासून सत्ताधारी आणि भाजप (BJP) यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच आघाडी सरकारमधील नेत्यामध्ये देखील नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नुकतंच काँग्रेसच्या 25 आमदारांनी नाराजी दाखवत थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिलं आहे. यावरुनच आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी ‘मविआ’ सरकारवर निशाणा साधला आहे.
”महाविकास आघाडीत काँग्रेसचे (Congress) 25 आमदार नाराज, शिवसेनेचेही (Shivsena) 25 आमदार नाराज, मग उरलं कोण? आतापर्यंत महाविकास आघाडीवर जर कुणी नाराज नसेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP). मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना आमदारांना कुणी विचारत नाही. सत्ता नसली तर काँग्रेस टिकणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, गृहनिर्माण सारखी खाती असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय,” अशा शब्दात ट्विट करत केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी काँग्रेस-शिवसेनेला चिमटा काढला आहे.
गृह, गृहनिर्माणसारखी खाती असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय. धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था सेना-काँग्रेसची झाली आहे. जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार? …2/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 31, 2022
पुढे केशव उपाध्ये म्हणाले, ”धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था शिवसेना-काँग्रेसची झालीय.
जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार? मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी चाललाय,
माझे कुटुंब (मुलगा, मेव्हुणा) माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी,”
असं सांगत केशव उपाध्ये यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला.
Web Title :- BJP Keshav Upadhye | BJP keshav upadhye criticizes shiv sena congress and ncp over congress mlas displeasure in mahavikas aghadi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update