Keshav Upadhye : ‘आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र आणि राज्य सरकार अनेक गोष्टीत आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात. त्यातच खासदार संजय राऊत यांनी लक्षद्वीपमध्ये गोमांस बंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केलीय. या टीकेला आता भाजपने पलटवार केला आहे. आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी दिले आहे.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

काय म्हणाले केशव उपाध्ये ? Keshav Upadhye
अजानस्पर्धा व जनाब बाळासाहेब ठाकरे पाहिल्यानंतर आता सामनामध्ये गोहत्या समर्थन पाहून महात्मा फुलेंचे उद्गार नव्या संदर्भात आठवले असल्याचं सांगत, सत्तेसाठी मती गेली, मतीविना हिंदुत्वाचा विचार गेला विचाराविना तत्व गेली, तत्वविना आचार गेले आचाराविना सगळेच गेले..इतके अनर्थ एका सत्तेने केले. असा टोला लगावत लक्षद्वीपवर गोमांसाला बंदीचा विषय आला शरद पवारांनंतर आता इकडे शिवसेनेचा जीव कळवळला आणि सामानाच्या अग्रलेखातून बोंब केली. आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका, अशी जोरदार टीका केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून केलीय.

संजय राऊत काय म्हणाले होते ?
आपण जो काही निर्णय घेणार आहोत, तो विचारपूर्वक आणि स्थानिकांना विचारात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे अस्वस्थता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम आख्ख्या भारताला भोगावा लागतो. कायदा सर्वाना समान असायला हवा. लक्षद्वीपमध्ये बीफबंदीचा कायदा तुम्ही आणला. परंतु, इतर भाजपाशासित राज्यांमध्ये तशी बंदी नाही. मग केवळ लक्षद्वीपमध्येच असा कायदा लागू झाला, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. म्हणून, राजकीय नेते अथवा प्रशासकीय अधिकारी, या सर्वानीच विचारपूर्वक पावले उचलली नाहीत, तर येत्या दिवसांमध्ये मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.

या दरम्यान, लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या एका निर्णयांमुळे स्थानिक पातळीवर बेरोजगारीसह इतर समस्या तयार होत असून, असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. यावरूनच भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी