भाजपची नवी ‘Missed Call’ मोहीम, शेअर केला ‘हा’ नंबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयकाला होणारा विरोध लक्षात घेऊन भाजपही आक्रमक झाल्याचे दिसतेय. सीएएच्या समर्थनासाठी भाजपने आता जोरदार मोहीम उघडली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर #IndiSupportsCAA ही मोहीम चावली होती. त्यासाठी काही मान्यवरांचे व्हिडीओही त्यांनी ट्विट केले होते.

सीएएला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देशभर प्रचंड विरोध केला. त्यासाठी मोर्चे आणि निदर्शनही केली आहेत. हा वाढता विरोध लक्षात घेऊन त्याची धार कमी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. यासाठी आता Missed Call देऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कार्यक्रमला पाठिंबा देण्यासाठी भाजपने ही मोहीम सुरु केलीय.

सीएएला देशभरात होणारा विरोध लक्षात घेता भाजपनेही या कायद्याला पाठिंबा देण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी 8866288662 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपला पाठिंबा जाहीर करता येणार आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन कायद्याला पाठिंबा देण्याचे आवाहन भाजपने केले आहे. यापूर्वी भाजपने आपल्या पक्ष समस्यांची नोंदणी करण्यासाठी या मिस्ड कॉलची मोहीम राबवली होती. आता पुन्हा एकदा सीएए कायद्याच्या निमित्ताने या मोहीमेचा पुन्हा एकदा वापर करताना दिसत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/