BJP Leader Anand Rekhi | “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम” – भाजप नेते आनंद रेखी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Anand Rekhi | भाजपने (BJP) राज्यसभेच्या (Rajya Sabha Election Result) तिनही जागा जिंकल्यानंतर भाजप नेते आनंद रेखी (BJP Leader Anand Rekhi) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ‘चित’ केले आहे. अत्यंत अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत संघटन तसेच नेतृत्व कौशल्याच्या बळावर ‘गणितशास्त्रा’चा चपखल बुद्धीकौशल्याने वापर करीत फडणवीस यांनी भाजपचा तिसरा उमेदवार निवडूण आणला, यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचं ते म्हणाले.

 

त्यावेळी आनंद रेखी म्हणाले, “राज्यसभेतील विजय म्हणजे भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा असलेल्या अतूट विश्वासाचे प्रतीक आहे. जनमताचा अनादर करणा-या महाविकास आघाडी सरकारला हा अप्रत्यक्षरित्या जनतेनेच शिकवलेला धडा असल्याचे,” ते म्हणाले. फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवडणुकीत 6 वा उमेदवार उभा करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना परवानगी दिली. आनंद रेखी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P. Nadda) यांचे देखील त्यांनी विशेष आभार मानले आहे.

दरम्यान, पुढे रेखी म्हणाले, “पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचे सोनं करीत फडणवीस यांनी निवडणूक कौशल्याच्या बळावर ‘चाणक्य’ नितीनूसार 6 वे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना निवडून आणले.
या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांच्यावर दाखवलेला विश्वास पक्षातील नेत्यांनी मेहनत आणि संघटनात्मक कार्यानी सार्थकी ठरला.
पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील महाराष्ट्राच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांना बळ दिल्याने त्यांचे आभार यानिमित्ताने रेखी यांनी व्यक्त केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अशाप्रकारे फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आघाडी सरकारचा धुव्वा उडवेल,” असा त्यांनी दावा केलाय.

 

Web Title :- BJP Leader Anand Rekhi | Opposition leader Devendra Fadnavis’s ‘Chanakya’ policy saluted – BJP leader Anand Rekhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा