काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘इश्क दीवाना’ची शुटिंग करत होते भाजपाचे माजी खासदार, FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशच २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. असे असताना दुसरीकडे सगळे नियम धाब्यावर बसवून माजी सुपौल खासदार आणि भाजप नेते विश्वमोहन कुमार यांनी आपल्या परिसर आणि घरात चित्रपटाचे शूटिंग करून लॉकडाऊनची चेष्टा केली आहे, शेकडो लोक आणि ग्रामस्थ या चित्रपटामध्ये सहभागी होते. विश्वमोहन कुमार हे सुपौल जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते मानले जातात. खासदार होण्यापूर्वी ते बिहार सरकारमध्ये मंत्रीही होते.

एसपी मनोज यांनी कडक कारवाई करत सुपौल येथील माजी खासदाराच्या रहिवासी संकुलात लॉकडाऊन दरम्यान सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल चित्रपटाचे निर्माते आणि माजी खासदार विश्वमोहन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.पोलिस स्टेशन प्रभारी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी फिल्म बनविणार्‍या कंपनीचे कॅमेरेही ताब्यात घेतले आहेत. लॉक-डाऊन असूनही भोजपुरी चित्रपट ‘इश्क-दिवाना’चे शूटिंग चालू होते, कोरोना लॉक-डाऊन दरम्यान शेकडो लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.

यानंतर या प्रकरणाची तक्रार सदर एसडीओ यांच्याकडे करण्यात आली. एसडीओ यांनी पिपराच्या बीडीओ आणि सीओ यांना तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र बीडीओ पिपरा ने आपल्या आधिकऱ्याला खोटी माहिती दिली की, कोणत्याही प्रकारचे शूटिंग झालेच नाही.

परंतु स्थानिक लोक याबाबत सतत तक्रारी करत राहिले, त्यानंतर एसपी स्वत: गावात पोहोचले आणि या प्रकरणाची चौकशी केली, त्यानंतर ही संपूर्ण कहाणी समोर आली. एसपीच्या आदेशानुसार चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात पिपरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात एसडीओ कयूम अन्सारी म्हणाले की, ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे. विशेष म्हणजे, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 1400 ओलांडली आहे आणि 41 लोकांचा बळी गेला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like