भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे ‘कोरोना’मुळे निधन

पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले (bjp leader and mla kiran maheshwari passes away she had tested positive for covid19)  आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी सहाडा येथील आमदार कैलास त्रिवेदी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.  किरण माहेश्वरी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवेसाठी समर्पित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.” असे बिर्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आमदार  माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती.

राजस्थानात 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर रात्रीची संचारबंदी
राजस्थानमधील करोनाचा वाढता संसर्ग पाहता, राज्यातील बहुतांश भागांमध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच, बाजारपेठा व अन्य व्यावसायिक ठिकाणे सायंकाळी 7 वाजेनंतर बंद ठेवण्यात आलेली आहेत.

You might also like