GST हा 21 व्या शतकातील सर्वात मोठा ‘वेडेपणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवळपास 3 वर्षांपूर्वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशभरात लागू करण्यात आला होता. तेव्हा केंद्र सरकारने कर सुधारणांसाठी मोठे पाऊल उचलले होते. परंतु आता भाजप नेत्यानेच हा टॅक्स 21 व्या शतकातील वेडेपणा असल्याचे सांगितले आहे. भाजपचे वरिष्ठ नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जीएसटीचा निर्णय वेडेपणाचा निर्णय ठरवला आहे.

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी –
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, तुम्ही गुंतवणूकदारांना आयकर आणि जीएसटी, जो 21 व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा होता, त्याना घाबरवून नका. स्वामींच्या मते जीएसटी इतका गुंतागुंतीचा आहे, की कोणीही तो समजू शकत नाहीये, कुठे कोणता फॉर्म भरायचा आहे. त्यांना वाटते की हे कंप्यूटरवर अपलोड केले जावे. सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान तेव्हा आले आहे जेव्हा सरकार जीएसटीतून मिळणाऱ्या महसूलामुळे चिंतेत आहे.

सरकारचे जीएसटी कलेक्शन अपेक्षा प्रमाणे मिळाले नाही. यामुळे ते वेळोवेळी जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. जीएसटी 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात लागू झाला. या अंतर्गत 5, 12, 18, 28 टक्के असे चार स्लॅब आहे. काही दिवसांपासून या टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यावर चर्चा सुरु आहे.

10 टक्क्यांनी वृद्धी आवश्यक –
यासह सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की देशात 2030 पर्यंत महाशक्ती बनण्यासाठी वर्षाला 10 टक्के वृद्धीदरासह पुढे जावे लागेल. ते म्हणाले की हा वेग कायम राहिला तर चीनला पुढील 50 वर्षात मागे टाकू आणि अमेरिकेला पहिल्या क्रमांकासाठी आव्हान देऊ शकू. स्वामी म्हणाले की भारतातसमोर आज देखील समस्या आहेत, त्यात मागणीची समस्या मोठी आहे. लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, ज्याचा परिणाम आर्थिक चक्रावर होत आहे.

You might also like