BJP Leader And Union Minister Narayan Rane | नारायण राणेंचा माजी मुख्यमंत्र्यावर घणाघात, म्हणाले – ‘शिवसेना संपायला उद्धव आणि आदित्य ठाकरेच जबाबदार, आता…’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून नारायण राणे (BJP Leader And Union Minister Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र सातत्याने शिवसेनेवर टिका करत आहेत. ठाकरे कुटुंबियांवर (Thackeray Family) वैयक्तिक टीका देखील केली जात आहे. आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader And Union Minister Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ठाकरे कुटुंबियांवर आम्ही टीका करणार नाही, असे कालच माजी मंत्री आणि बंडखोर शिंदे गटातील (Eknath Shinde Group) कोकणातील नेते आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले होते. त्यानंतर ताबडतोब राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर पुनश्च टीका केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

केंद्रिय मंत्री नारायण राणे हे गोव्यावरून (Goa) कणकवलीकडे जात असताना सावंतवाडीत थांबले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, शिवसेना संपवायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्यांना सरकार वाचवता आले नाही. याच्यासारखे दुर्देव नाही. आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी शापवाणीच राणे यांनी केली. (BJP Leader And Union Minister Narayan Rane)

 

राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदारांना भेट टाळणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच आमदार फुटले.

 

संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले,
संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे न्यायचे काम केले. राणे यांना टार्गेट करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश होता.
पण मी सांगितल्याप्रमाणे हे सरकार कोसळले आहे.

राणे म्हणाले, महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करत आहे. नवनवीन प्रकल्प राज्यात येतील.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच चांगले काम करतील.
नवीन सरकार सहा महिन्यात कोसळेल असे शरद पवार यांनी म्हटले होते त्यावर राणे म्हणाले,
महाराष्ट्रात सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे पवार यांनी कधीतरी चांगले बोलावे.

 

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी केलेल्या कौतुकावर बोलणे टाळत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले, खरोखर आमची आदरयुक्त भिती होती.
दहशतवाद करत बसलो नव्हतो. किंवा मी मुख्यमंत्री आहे हे सांगावे लागत नव्हते.
या प्रसंगी नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर मात्र बोलणे टाळले.
नो कॉमेंट्स असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

 

आमदार नितेश राणे हे मंत्री होणार का ? असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले पक्ष काय तो निर्णय घेईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत.
अजून यादी तयार झालेली नाही. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी (Manish Dalvi), संजू परब (Sanju Parab),
अजय गोंदावले (Ajay Gondavale) आदि उपस्थित होते.

 

Web Title :- BJP Leader And Union Minister Narayan Rane | former chief minister uddhav thackeray and aditya thackeray are responsible for shiv senas demise bjp leader and union minister narayan-rane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा