‘देर आए, दुरूस्त आए’, पुरग्रस्त भागाच्या दौर्‍यावरून भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नुकसाग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्या या पाहणी दौ-यावर देर आए, दुरुस्त आए असे म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलीवूडमधून बाहेर पडून थेट शेतक-यांच्या बांधावर गेल्याने काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दौ-याला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलो आहे. तुम्ही एकटे नाही, कोणीही वा-यावर पडल नाही. आपल सरकार हे तूमच सरकार आहे.तुम्च्या पाठीशी आहे. नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देवू नका. किती नुकसान झाले आहे, याचे पंचनामे सुरु आहेत. माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. माहिती गोळा करून त्याचे अभ्यास करत बसणार नाही. लवकरच मदत जाहीर करू असे आश्वासन त्यांनी शेतक-यांना दिल. तसेच विरोधी पक्षांनी राजकारण करू नय. आपत्ती काळात केंद्र आणि राज्य अस काही करू नये. केंद्राकडून राज्याला जे देण असेल ते केंद्र सरकारने द्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही : फडणवीस
अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांच नुकसान झाल आहे. त्यामुळे पंचनामे वगैरे न करता तातडीने मदत केली पाहिजे. जनावरांना चारा दिला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पावल उचलावी. अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान मोदी यांनी उध्दव ठाकरे यांना फोन करून मदत देण्याच आश्वासन दिल आहे. परंतू राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखू तातडीने मदत केली पाहिजे. मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी 10 हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली. केंद्राच पथक येईल, नुकसानीचा आढावा घेईल राज्य सरकारन जबाबदारी झटकून चालणार नाही. केंद्र सरकार मदत करणार आहे. पण तो पर्यंत राज्य सरकारन मदत करायला हवी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे.