‘युवराजांनी मला ‘म्हातारीचा बुट’ हवाय म्हणून ‘बालहट्ट’ केला नाही म्हणजे मिळवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाईट लाईफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आणि 26 जानेवारीपासून नाईट लाईफला सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा नाईट लाईफला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याने सरकाराने कोणत्याही पद्धतीचे नियोजन न करता घाईत नाईट लाईफचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजपचे नेते अशिष शेलार यांनी या मुद्यावरुन शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. अशिष शेलार यांनी ट्विट करुन पोलिसांची तयारी नसताना नाईट लाईफचा निर्णय लादला. मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का अशा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये मेट्रो 3 चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच कारशेड सुरु करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी आरे मेट्रो कार शेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बंधनकारक नाही असे मत व्यक्त केले. यावर बोलताना अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर व्यंगात्मक टीका केली की एक दिवस युवराजांनी मला म्हातारीचा बुट हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं.

पहिल्या दिवशी नाईट लाईफला मुंबईकरांनी सामान्य प्रतिसाद दिला. हॉटेल आणि मॉल रात्री 3 वाजता बंद करण्यात आले तर काही ठिकाणी रात्री 12 नंतर ऑर्डर घेणे बंद करण्यात आले होते. तर काही मॉल चालकांनी अद्यापही निर्णय घेतला नाही. वीकेंडला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा हॉटेल आणि मॉल चालकांनी व्यक्त केली आहे. मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वता मान्यता दिली आहे. नाईट लाईफची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली, ते म्हणाले की पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, त्यांना पुर्वी प्रमाणेच दीड वाजेपर्यंत त्याचे व्यवसाय सुरु ठेवता येतील.

फेसबुक पेज लाईक करा –