‘स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे…’ ; शेलारांचा मुंडेंवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले… स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे… असे म्हणत मुंबई भाजापचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मुंडेंवर सडकून टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटनंतर आशिष शेलार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात की, “रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले… स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे… धनंजयराव चिडले ? लेकीन अबे ओ सांबा.. आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ? वो तो देखलो !.. लढ धन्नो..!!” असे म्हणत शेलार यांनी मुंडेंवर बोचरी टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. #ChokidarकेSideEffects असा हॅशटॅगही त्यांनी ट्विटमध्ये वापरला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की,

काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना
मंत्रिपद दिलं जायना
शिवसेनेविरोधात राबराब राबवले
पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले
प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले
आता यांना यांच्यातलेच कवी ‘आठवले’