समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारनं अरबी समुद्राचं पाणी गोड करून वापरण्याचा नवा प्रकल्प नुकताच हाती घेणार आहे. समुद्राचं पाणी गोड करण्याचा महाग प्रकल्प मुंबईकरांना परवडणार आहे का? असा सवाल भाजपचे नेते अशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या या प्रकल्पावरून भाजपने शिवसेनेने हललाबोल केला आहे.

आशिष शेलार यांनी महापालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठून ट्विट केलं आहे. “समुद्राचं पाणी गोड करून मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी खर्च होणार आहे. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? याबाबत फेरविचार करावा.”

काय आहे हा प्रकल्प
मुंबईत मनोरी येथे समुद्राचं २०० दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. तलावातील पाणी शुद्ध करून ते मुंबई पोहोचविण्यासाठी महापालिका एक हजार लिटर पाण्यासाठी १६ ते १७ रुपये खर्च करते तर या नव्या प्रकल्पात हाच खर्च ३० रुपये इतका आहे.

You might also like