‘आमचं हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी विजयादशमीच्या (Vijayadashami) मेळाव्यात हिंदुत्वाविषयी मांडलेल्य विचारांचा शिवसेनेकडून विपर्यास करून सोयीस्कर असा अर्थ काढण्यात आला. सरसंघचालकांची ती व्याख्या म्हणजे हिंदुत्वाची खरी त्वचा आहे. मात्र शिवसेनेनं सत्तेसाठी या त्वचेचा त्याग केला आहे. आता शिवसेनेच्या अंगावर केवळ हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. त्यामुळं हिंदुत्वाची त्वचा आणि शाल यांची तुलना होऊच शकत नाही असं वक्तव्य भाजप नेते आशिल शेलार (Ashish Shelar) यांनी केलं आहे.

‘उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व भेसळयुक्त’
आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व भेसळयुक्त झालं आहे. त्यांना आमच्याकडून आणि काळ्या टोपीवाल्यांकडून हिंदुत्वाचं सर्टीफिकेट घ्यावं लागेल. तसंच टाळ्या आणि थाळ्या यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ते केवळ कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं असंही शेलार म्हणाले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखला देत भाजपच्या नेत्यांना टोले लगावले होते. हिंदुत्व हे पूजाअर्चा किंवा मंदिरापर्यंत मर्यादित नाही असं ठाकरे म्हणाले होते. याच टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीका केली.