जनाची नाही तर मनाची बाळगा, दसऱ्या मेळाव्यावरून भाजपची शिवसेनेवर जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाच्या (Corona ) संकटामुळे सरकारने अनेक सार्वजिनक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. लग्न समारंभांना देखील केवळ ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कोरोनच्या संकटामध्ये देखील शिवसेनेच्या ( Shivsena ) शिवतीर्थावरील दसरा मेळावा ( Dusra Melava) यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी टीका करताना अतुल भातखळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाईपासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतात. अहो जनाची नाही तरी मनाची…”अशी टीका केली आहे. भातखळकरांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कसा होणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. या दसरा मेळाव्याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी यंदाचा दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचं स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु होती. त्यावर अखेर आज पडदा पडला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. या कोरोनाच्या संक्रमणामुळे स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचं व्यासपीठ उभं करुन शिवसेना ( Shivsena) पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केलं जाईल, अशी सूचना मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर या मेळाव्यासाठी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like