भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे, या मागणीसह इतरही काही विषयांवर बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.
मात्र या भेटीवरून भाजप bjp आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा.
सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये ? असे भातखळकर यांनी म्हटलं आहे.

भाजप bjp आमदार भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
आज आलं अंगावर ढकलल केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत.
वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय,
तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार.
झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा.
सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये.
या ट्विटसोबत भातखळकरांनी मुख्यमंत्र्याचे एक व्यंगचित्रदेखील जोडले आहे.
यावर उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे. सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात, असे लिहले आहे. खरे तर मराठा समाजाला शिक्षण अऩ् नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासूनच राज्यातील भाजप bjp नेत्यांकडून ठाकरे सरकारला लक्ष करून त्यांची कोंडी करण्याचा प्रय़त्न सुरु आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रदेश भाजपकडून केला जात आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत