कर्नाटकात पुन्हा ‘कमळ’ फुलणार ; येडियुरप्पांचा सरकार स्थापनेचा दावा

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकातील सत्तानाट्य मंगळवारी अखेर संपले. कर्नाटकातील आघाडीच्या पंधरा आमदारांनी बंडाचे निषाण फडकवल्याने कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरवावेळी कुमारस्वामींना ९९ मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात १०५ मतं पडली. कर्नाटकात कुमारस्वामींचे सरकार पडल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपाचे येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजभवनात दाखल झाले. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी १०५ आमदरांचा पाठिंबा असल्याचे पत्र रज्यापालांना सोपवले. दरम्यान, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी येडियुरप्पा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून आज संध्याकाळी येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे.

कर्नाटकात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकरपुढे बहुमत सिद्ध करणे हे मोठे आव्हान असणार आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारी तीन बंडखोर आमदारांचे कृत्य पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अयोग्य असल्याच म्हटले आहे. तसेच अजूनही १४ बंडखोर आमदारांचे राजीनामे स्विकारणे शिल्लक आहे. अशातच सभागृहात आमदरांची संख्या २२२ इतकी आहे. भाजपाला बहुमतासाठी ११२ आमदारांची आवश्यता असून त्यांना १०६ आमदारांचे समर्थन आहे. भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी ६ आमदारांची आवश्यता असून हे पाठबळ भाजपा कसे मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –