काँग्रेसचे २० आमदार आमच्या संपर्कात : भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

बंगळुरू : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच तिकडे कर्नाटकात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये युद्ध रंगले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यापासून तिथे भाजप कुरघोड्या करत आहे. काँग्रेसचे राज्य गेले तरी काँग्रेस पुरस्कृत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार कर्नाटकात आले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांच्या वक्त्यव्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी हे विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला खरे वास्तव कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. निकाल लागल्यानंतर सगळे आमदार पुन्हा भाजपकडे येतील. एक कार्यकर्ताही काँग्रेसकडे जाणार नाही, असेदेखील येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाने समाधानी नसलेले २० काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

You might also like