शरद पवारांवर अभ्यास सुरु, लवकरच PhD करणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरु असून लवकरच त्यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil ) यांनी व्यक्त केले आहे.

एका वृतवाहिनीला मुलाखात देतांना त्यांनी एकीकडे शरद पवार यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर मात्र कडक टीका केली. पाटील यांनी यावेळी आघाडी सरकारसह कॉंग्रेस नेतृत्वावरही टीका केली. तरुण कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. कॉंग्रेसला लोक टिकवून ठेवता येत नाही, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. तसेच सध्या राज्यात गाजत असलेल्या वीजबीलावरही पाटील यांनी भाष्य केले. आघाडी सरकारमध्ये कोणत्याच कामात समन्वय नाही. एकाच विषयावर दोन मंत्री वेगवेळी विधाने करतात, असे सांगत वीजबील भरले नाही, म्हणून शेतक-यांचे वीजजोड तोडू नये, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आहे.

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांनी कडक शब्दात टीका केली आहे. ठाकरे यांना मंत्रालय कुठ आहे हे देखील माहिती नव्हते. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अभ्यास वाढविणे गरजेचे असल्याचा टोला लगावला.

… खा. सुप्रिया सुळेंनाच पसंती देतील
यावेळी आमदार पाटील यांनी शरद पवार यांचा राजकीय वारस कोण यावर गुगली टाकत भविष्यात राज्याचे नेतृत्व करण्यास शरद पवार अजित पवाराऐवजी सुप्रिया सुळे यांनाच पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला.

You might also like