हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत पण…, BJP – MNS युतीवर चंद्रकांत पाटलांची ‘ही’ अट

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – काल मनसेचे अधिवेशन पार पडले यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण केले तसेच आपल्या भाषणाची सुरुवात राज यांनी जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशा शब्दात केली. त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाच्या वाटेने जाणार असे निश्चित झाले आहे. त्यामुळे हिंदू पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजप नेत्यांकडून मनसेचे स्वागत होताना पहायला मिळाले आहे.

मनसेने हिंदुत्व अंगिकारले आहे त्याबाबद्दल त्यांचे स्वागत मात्र परप्रांतीयांबद्दल मनसेला भूमिका बदलावी लागेल कारण पर प्रांतीयांवर अन्याय करणे भाजपला मान्य नसल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मनसेने जर परप्रांतीयांबाबतची आपली भूमिका बदलली तर भाजप आणि मनसे सोबत येऊ शकतात असे पाटील यावेळी म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील इतर पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर आम्ही देखील सत्यासाठी एकत्र येऊ असे सूचक विधान मनसे बाबत केले होते.

काल झालेल्या अधिवेशनात राज ठाकरेनी मला मराठी म्हणून नख लावलं तर मराठी म्हणून समाचार घेईल आणि हिंदू म्हणून नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल असे स्पष्टपणे सांगितले तसेच राज यांनी पाकिस्तानबाबत अनेक गोष्टींवर हल्लाबोल केला.

फेसबुक पेज लाईक करा –