चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी नुकतीच शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
या भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) अन् शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही, सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी आहे.
त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस असे चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी म्हटले होते.

पाटील यांच्या या विधानावर राऊत  यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पाटील हे गोड आहेत.
त्यानी असंच कार्यकर्त्यांशी गोड-गोड वागावं, गोड बोलावं आणि कुणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो, असा टोला राऊत यांनी लगावला होता.

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’

पुण्यात घरोघरी लसीकरण या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी आहे. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस नाही, असे म्हणत पाटलांनी राऊतांना जोरदार चिमटा काढला. तसेच अजित पवार यांच्यावर सध्या संजय राऊत sanjay raut यांची सावली पडली असून त्यांनाही राऊतांचा गुण लागल्याचा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.
दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस असल्यामुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पहिल्यांदाच पुण्यात पाटील यांचा इतका मोठा वाढदिवस साजरा होत आहे.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्याशी जवळीक साधण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसून आले.

Nashik News | काय सांगता ! होय, ‘कोविशील्ड’ची दुसरी लस घेतल्यानंतर ज्येष्ठाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू; व्हिडीओ व्हायरल

लॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’