BJP Leader Chandrakant Patil | “…म्हणजे गोळवलकर आणि हेडगेवारांनी खोक्यांनी पैसे घेतले”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची उपरोधात्मक टीका

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Chandrakant Patil | डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक विधानामुळे अनेकांच्या निशाण्यावर असलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अखेर त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) निशाणा साधला आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवारांचे नाव घेऊन पाटलांवर उपरोधात्मक टीका केली आहे. ‘फुले-आंबेडकरांनी भीक मागितलं असं वक्तव्य करताना चंद्रकांतदादांनी गोळवळकर, हेडगेवार यांचं नाव घेतलं नाही म्हणून मी त्यांना समर्थन देतो,’ अशी उपरोधिक टीका करत आंबेडकरांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘लोकांकडून पैसे फुले, आंबेडकरांनी घेऊन शाळा, शिक्षणसंस्था उभ्या केल्या,
असं चंद्रकांतदादा म्हणाले. पण असं वक्तव्य करताना त्यांनी गोळवलकर आणि हेडगेवारांचं नाव घेतलं नाही. याचाच अर्थ गोळवलकर आणि हेडगेवारांनी लोकांकडून पैसे न घेता आजच्या शब्दात सांगायचं झालं तर खोक्यांनी पैसे घेतले आणि स्वत:च्या संस्था उभ्या केल्या ही कबुली चंद्रकांतदादांनी (Chandrakant Patil) दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो.’

‘शाळा सुरू कुणी केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांनी या देशात
शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही.
त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केल्या, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका चालू होती.
अखेर चंद्रकांत पाटलांनी, कुणाची मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे
म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.

Web Title :-BJP Leader Chandrakant Patil | prakash ambedkar slam chandrakant patil over his controversial statement on dr ambedkar and mahatma phule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | शासकीय मंजुरीनंतर एकाच प्रकल्पाच्या श्रेयवादासाठी दोन राजेंमध्ये लढाई

Ramdas Athawale | सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या; टीका करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले – रामदास आठवले