BJP Leader Chandrashekhar Bawankule | राज्यपालांच्या बदलीबद्दल भाजपकडे एकच प्रतिक्रिया? चंद्रकांत बावनकुळेंनी दिले देवेंद्र फडणवीसांसारखे उत्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Chandrashekhar Bawankule | काही दिवसांपासून राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्याआधी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यात शरद पवार, उदयनराजे भोसले, उद्धव ठाकरे आदींचा समावेश होतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या बदलीबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांप्रमाणे केंद्र सरकारकडे इशारा केला आहे. (BJP Leader Chandrashekhar Bawankule)

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण खूप तापले आहे. राज्यपाल कोश्यारींवर महाराष्ट्राच्या राजकीय असो किंवा सामाजिक अशा सर्व पातळ्यांवरून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज्यपालांचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी घ्यावा,’ अशी मागणी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी ‘हे केंद्राचं पार्सल माघारी घेऊन जा, नाहीतर महाराष्ट्र बंद करू’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया दिली. (BJP Leader Chandrashekhar Bawankule)

‘राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. भगतसिंग कोश्यारी यांना ठेवायचं की नाही, हे ठरवायचा अधिकार आम्हाला नाही.
ज्यांना तो अधिकार आहे, ते याचा निर्णय घेतील,’ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
तसेच प्रतापगड किल्ल्यावर आज (३० नोव्हेंबर) शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे.
परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शविण्यासाठी या सोहळ्याला
जाणे टाळले आहे. याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले, “उदयनराजे भोसले असो किंवा आम्ही असो…
आमच्यापैकी कोणाचीही भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.
त्या दिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे
ते निर्णय घेतील.”

Web Title :- BJP Leader Chandrashekhar Bawankule | governor is a constitutional post we have no right to keep him or not says bjp maharashtra president chandrasekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर