‘हे सरकार सत्तेत आणल्याचा पवारांना पश्चात्ताप होतोय का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेनं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपल्या वर्षभराचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठवला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठवलं आहे. जाणत्या राजाला असा दृष्टीकोन शोभत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

राज्यपालांनी पाठवलेल्या अहवालावर शरद पवार यांनी पाठवलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद दुसरा प्रसंग वगळता शपिथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चस्पद गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्रे आहेत असं शरद पवारांनी पत्रात म्हटल्याचं प्रसिद्ध झालं आहे. हा अहवाल पाहिला तर त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या 28 नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या 30 डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे (Photos of the swearing-in ceremony) आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळं असं सरकार सत्तेवर आणल्याचा पश्चात्ताप होतोय हे त्यांनी सांगितलं पाहिजे. यासाठी राज्यपालांच्या अहवालाचा आधार त्यांनी घेऊ नये असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढं बोलताना पाटील म्हणाले, संपूर्ण अहवालात अनेक मान्यवरांच्या भेटींची छायाचित्रे आहेत. परंतु आपले छायाचित्र मान्यवर नेत्यांमध्ये दिसत नाही हे जाणवल्यामुळं व्यथित होऊन शरद पवार यांनी असं पत्र लिहलंय का अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पाटील म्हणतात, शरद पवार ज्यांना अन्य छायाचित्रांमधील एखाददुसरा प्रसंग म्हणतात, त्यात राज्यपालांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणं, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणं, नंदूरबार जिल्ह्यात आदिवासींसोबत नृत्याच ठेका धरणं, जालना येथे पन्नास हजार विद्यार्थ्यांसाठीच्या मध्यान्ह भोजन प्रकल्पाचं लोकापर्ण करणं अशी अनेक छायाचित्रे आहेत अशी. अन्य छायाचित्रे शरद पवारांना दिसली नाहीत हे आश्चर्य आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पाटली असंही म्हणाले, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरे उघडण्याबाबत लिहिलेले पत्र हे ऑक्टोबर महिन्यातील आहे. हा वार्षिक अहवाल सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. जाणत्या राजाला या कालावधीचंही भान राहिलं नाही आणि ते या अहवालात पत्र शोधत राहिले हेही आश्चर्यकारक असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

You might also like