महिला वर्गासाठी पुर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प : चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानभवनात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी अर्थसंकल्पावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्पामध्ये फक्त भाषण होते, आकडे कुठेच नव्हते अशी टीका केली आहे. आता यामध्ये भाजप नेत्या चित्र वाघ यांनी उडी घेतली असून, यंदाचा अर्थसंकल्प हा महिलांना नाराज करणारा आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले असताना, अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना आणि भरीव तरतूद होणे आवश्यक होते. मात्र सरकारने महिला वर्गाचा पूर्णपणे अपेक्षाभंग केला असल्याचे चित्र वाघ म्हणाल्या. त्यामुळे घोषणांचा पाऊस कुठे पडेल ? काही सांगता येत नाही.

विभागीय आयुक्तस्तरावर महिला आयोग कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती, परंतु महिला सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी लागणारी दृष्टी या अर्थसंकल्पात दिसत नाही असेही चित्र वाघ यांनी सांगितले.