भाजपच्या ‘या’ नेत्याला पैशांचा माज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाहीये. अश्या शब्दात त्यांनी दानवेंवर टीका केली.

आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. दरम्यान जालण्यात आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेत आणि मला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत. आता तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन. असे वक्तव्य भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांतर्फे निषेध करण्यात येत आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाहीये. दानवे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष कसे आहेत ? ते मला कळत नाही त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरून देणार असे आमदार बच्चू कडू यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांसाठी चुकिची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलायला पाहिजे याचे भान त्यांना असले पाहिजे असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले” संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.