शिवेंद्रराजेंना सातार्‍यात धक्‍का देण्यासाठी शरद पवारांची खेळी, ‘हा’ दिग्गज नेता राष्ट्रवातीत प्रवेश करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय संपादन करण्यासाठी खेळी करण्यास सुरुवात केली आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्याला गळाला लावले आहे. दोन वेळा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहिलेले दीपक पवार हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार हे यावेळी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यावेळी दीपक पवार प्रवेश करणार असल्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे यांना तगडी टक्कर मिळणार आहे. शरद पवार देखील आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून शरद पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर आता उरलेल्या उमेदवारांची घोषणा कधी करतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, भाजपने साताऱ्यातील दोन्ही राजांना गळाला लावल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी भाजपला कशाप्रकारे टक्कर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

visit : Policenama.com