राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विश्व हिंदू परिषद व राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर उभं करायचंय. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राम हे संपूर्ण समाजाचं असून त्यांचं मंदिर वर्गणीतून तयार होईल. तुम्ही मदत द्या, तुमच्याकडे ही पाठवू, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेना पक्षाचं नाव न घेता हाणलाय.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी लिखित ’अयोध्या’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांनी मुद्दा उपस्थितीमध्ये केला होता की, राम मंदिर लोकांच्या मदतीने उभं करायचं का, ट्र्स्टच्या पैशातून ?. सोमनाथ मंदिराच्या वेळेस असाच मु्ददा उपस्थित झाला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जनतेच्या मदतीने करायची भूमिका घेतली होती. मात्र, त्यावेळी सरदार पटेल यांना पंडित नेहरुंनी विरोध केला होता. पण, राष्ट्रपिता म. गांधी यांनी सरदार पटेल यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं.

फडणवीस म्हणाले, धर्मनिरपेक्ष राहणे गरजेचे आहे. पण, धर्म तिरस्कार करायचा असा नाही. कोणाच्या पोटात दुखलं तरी चालेल पण, समाजाच्या मदतीनं मंदिर उभे राहील. 2024 च्या निवडणुकीच्या अगोदर मंदिर खुले होईल. समाजाच्या मंदिर समाजाच्या भरोसावर तयार झाले पाहिजे.

अनेक दशकं राम मंदिर संघर्ष सुरूय. अयोद्धा मंदिर आणि मशीद वाद नव्हता. मंदिराची जागा कमी नव्हती. बाबराला मंदिराची जागा हवी होती. कारण, एखाद्या समाज मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर आत्मासन्मानावर संस्कृतीवर घाला घातला जातो. तेच त्यावेळी बाबरानं केलं होतं, असं फडवणीस म्हणाले.

आपले मानबिन्दु गुलामिगीरीत टाकण्याच काम बाबरानं केलंय. हिंदु संस्कृतीने प्रत्येकाला सहारा दिला होता. पण, त्याचा गैरफायदा काही जणांनी घेतला आहे, असेही फडवणीस म्हणाले.