मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- मनसे युती होणार का? फडणवीसांनी दिले उत्तर, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसेसोबत  युती करणार का यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तर दिले आहे. फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणाले की, विचार जुळल्यास युतीसंदर्भात निर्णय घेता येईल.

मात्र दोन्ही पक्षांची क्षेत्रीय अस्मितेसंदर्भातील मत जुळली नाही तर मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही, या मताचे आम्ही आहोत.

ही मत आतातरी भाजपची BJP आणि मनसेची वेगवेगळी आहेत.

ती मत जुळली तर वेगळा विचार करता येईल. पण सध्यातरी ती जुळत नाहीत.

ती जुळत नसली तर युतीचा कोणता प्रश्नच निर्माण होत नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस एका वेबिनार कार्यक्रमात बोलत होते.

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

सध्या आमच्यासोबत युतीत असलेल्या लहान पक्षांना सोबत घेऊनच आम्ही मुंबई मपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांना नवीन एखादा कोणी येईल असे वाटतं का असा प्रश्न विचारला असता यावर फडणवीस थेट उत्तर देत म्हणाले की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत, असे ते म्हणाले.

तुमच्या तोंडाचा वास येतो का? त्याचे कारण आणि उपाय जाणून घ्या

आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे.

Pune : पुण्याच्या सदाशिव पेठेतील बिल्डरला 30 लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाने धमकावले, शशिकांत गोलांडे अन् निलेश देशपांडेविरूध्द FIR

जी काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करु.

पण क्षेत्रीय अस्मितेसोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिता देखील महत्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही.

पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घ्यायचे आम्हाला योग्य वाटत नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, रुग्णांची लूट थांबणार

 

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1896 रुग्ण ‘कोरोना’मुक्त