देवेंद्र फडणवीसांचे ‘ठाकरे सरकार’वर ‘गंभीर’ आरोप, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सरकार बेईमानाचे सरकार आहे. हे सरकार जनसेवेसाठी नाही तर डल्ला मारण्यासाठी सत्तेवर आले आहे. आम्ही नुकतीच शपथ घेतली, अजून आमचे खिसे गरम व्हायचे आहे, असे स्वत: मंत्री जाहीर सभांमधून सांगत आहेत. जे मनात आहे, तेच आता शब्दांमधून बाहेर पडू लागले असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील प्रचार सभांमधून केला.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा आजचा पाचवा दिवस आहे. आजच्या प्रचाराची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील खैरगाव येथून केली. ते म्हणाले, भरूपर अटींची कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक रुपया सुद्ध मदत नाही, अशी अन्यायाची मालिकाच आता सुरु झाली आहे. 10 रुपयात जेवण देण्याचा गाजावाजा करुन सुरु केली. मात्र, 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ 18000 लोकांनाच त्याचा लाभ होणार आहे. तो सुद्धा प्रचंड अटींवर आधारित आहे. 50 लाख लोकसंख्या असलेल्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात केवळ 700 लोक याचे लाभार्थी ठरतील, असे सांगत त्यांनी सरकारने सुरु केलेल्या योजनेवर टीका केली.

50 लाख शेतकऱ्यांना 19 हजार कोटींची कर्जमाफी भाजपने मागील पंचवार्षीक योजनेत केली होती. मात्र, या सरकारने सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेले शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला. हा आघाडी सरकारचा मुर्ख बनवण्याचा धंदा आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/