बाळासाहेबांनी ‘तसा’ शब्द घेतला असेल, असं वाटत नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना ‘खोचक’ टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र, भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले. निकालानंतर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेबांना दिल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं होतं. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

मला उद्धव ठाकरेंचे आश्चर्य वाटते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करने, असं वचन बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडून घेतले असेल, असं मला वाटत नाही. असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेबांनी काँग्रेसवर कायम टीका केली होती. त्यांनी काँग्रेसला टोकाचा विरोध केला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांचे काँग्रेससोबत गेले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेना आमच्यासोबत असताना त्यांचा मान राखला जायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचे फडणवीस यांनी सांगितेल. आमच्यासोबत असताना मातोश्रीवरून आदेश द्यायचे आणि ते आम्ही पाळायचो. मात्र, आता सिल्व्हर ओक, ट्रायडंटवर जावं लागतं, असा चिमटा देखील त्यांनी काढला. आताचे सामनाचे आग्रलेख पहा. त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना काँग्रेसला खूश ठेवायचे आहे. शिवाय जुन्या मित्रांनादेखील सांभाळायचे आहे. तीन पक्षांचे सरकार फारकाळ चालत नाही, हा इतिहास आहे, असे फडणवीस म्हणाले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like