‘या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होईल’, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पंढरपूर विधनसभा पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरमधील मतदारांचे आभार मानत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी माहाराष्ट्रात योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, पण आता सध्या कोरोनाचा काळ आहे, आम्ही राज्य सरकारला पूर्ण मदत करत आहोत, योग्यवेळी कार्यक्रम केला जाईल तेव्हा घडामोडी कळतीलच, असं सूचक विधान फडणवीस यांनी केले. फडणवीसांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पंढरपूरच्या निकालानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पंढरपूरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे पंढरपूरमधील जनतेचा आभारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गैरकारभाराला जनतेनं देलेलं उत्तर आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन साम, दाम, दंड, भेद याचा वापर केला. तरी देखील पंढरपूरमधील जनतेने भाजपला साथ दिली. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक साथ दिली. कोरोना काळात कोणालाच मदत केली नाही त्यामुळे नाराज मतदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. हा निकाल सरकारच्या विरोधातील आहे, असे फडणवीस म्हणाले.

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी प्रचारसभेत बोललो होतो की, यांचा योग्य वेळी कार्यक्रम करेन. पण आता ती योग्य वेळ नाही. काय करायचे आहे ते योग्य वेळी करेल. त्याच्या घडामोडी या सर्वांनाच पहायला मिळती. मात्र आता आपली लढाई कोरोना विरोधातील आहे. आम्ही राज्य सरकारला पूर्ण मदत करत आहोत, योग्य वेळ आली की कार्यक्रम हा होणार, असे त्यांनी स्पष्ट केले

बेगाने शादी मे अब्दुला दिवाणा

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बोरची टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘बेगाने शादी मे अब्दुला दिवाणा’ काही जण करत असतात. तसंच संजय राऊत यांचे झाले आहे. शिवसेनेला आता अस्तित्व नाही, महाराष्ट्रातील जनता जिगरबाज होती. तुम्हाला भाजपसोबत निवडून दिले पण तुम्ही दुसरी वाट धरली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

आमचाही कार्यक्रम ठरलाय

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम सुरु करावा, आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. दोन कार्यक्रम होतील. पंढरपूरच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलणार नाही. स्थानिक राजकीय समीकरणानं हा पराभव झाला आहे. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.