BJP Leader Divya Hagariga Arrest | PSI भरती घोटाळा प्रकरणात CID ने भाजप महिला नेत्याला पुण्यातून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Divya Hagariga Arrest | कर्नाटकातील (Karnataka) पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणातील (PSI Recruitment Scam) आरोपी आणि भाजप (BJP) नेत्या दिव्या हागारगीला (Divya Hagargi) सीआयडीने (CID) पुण्यातून अटक (Arrest) केली आहे. पीएसआय भरती घोटाळा प्रकरणात गुन्हे अन्वेशन विभागाने 5 जणांना अटक केली असून प्रमुख आरोपी दिव्या हागारगीला पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील ही 18 वी आरोपी आहे. यापूर्वी पोलिसांनी दिव्या यांच्या पतीला अटक केली होती. त्यानंतर ती फरार झाली होती. (BJP Leader Divya Hagariga Arrest)

 

पीएसआय भरती घोटाळाप्रकरणी न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर (Court Rejected Petition) कर्नाटक सीआयडीने (Karnataka CID) आरोपींचा शोध सुरु केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिव्या हागारगी यांना गुरुवारी (दि.28) पुण्यातून (Pune) अटक केली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र (Karnataka Home Minister Araga Jananendra) यांनी यासंदर्भात माहिती दिली. गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने (Gulbarga Junior Court) मंगळवारी भाजप महिला नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी (Arrest Warrant Issue) केले होते. त्यापूर्वी आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला होता. (BJP Leader Divya Hagariga Arrest)

कोण आहे दिव्या हागारगी ? (Who is Divya Hagariga)
दिव्या हागारगी या भाजपच्या महिला नेत्या असून त्या ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रमुख आहेत. तसेच कुलबुर्गी भाजपच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. पीएसआय भरती घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी दिव्या हागारगी यांची भेट घेतली होती.

 

Web Title :- BJP Leader Divya Hagariga Arrest | Karnataka CID arrested bjp leader divya hagariga in psi recruitment scam from pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा