एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी 20 मिनीटं चर्चा, दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाची घोषणा करावी यासाठी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 20 मिनिटे चर्चा झाली. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे विधानभवनात जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले आहे. यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. सिंचन प्रकल्पासंदर्भात मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे असंही खडसे म्हणाले.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “परळी वैजनाथ भगवान गडावर येथे पंकजाताई मुंडेंनी स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दरवर्षी आम्ही तिथे असतो. मी मंत्री असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं स्मारक औरंगाबादमध्ये उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं. मागील सरकारच्या काळात हे काम झालं नाही. त्याच संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं. मागील सरकारच्या काळात हे काम झालं नाही. तुमच्या कार्यकाळात या स्मारकाची घोषणा करावी अशी विनंती मी ठाकरेंना केली आहे.” असे म्हणत खडसेंनी भाजपला टोला लगावला.

दरम्यान तुम्ही नाराज आहात असं काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नाराजीच्या वृत्ताचं खंडन केलं. खडसे म्हणाले, “मी नाराज आहे हे वृत्तचं चुकीचं आहे. मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी उघडपणे दिसत आहे. माध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. कालही खडसेंनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. इतकेच नाही तर आजही त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. यानंतर आता खडसेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like