खडसे यांच्या नाराजीवर भुजबळांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वात जास्त जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागल्याने भाजपमधील नाराजीचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे हे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले असले तरीही ते पक्षातील अंतर्गत घडामोडी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते आहे. मात्र याबरोबरच खडसे दुसऱ्या बड्या राजकीय नेत्यांना भेटणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत, माध्यमांसमोर त्यांनी आपली हि नाराजी वेळोवेळी व्यक्त देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी खडसे यांना तिकीट नाकारले तसेच रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यामागे देखील पक्षातील काही नेत्यांचा हात असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. यामुळे एकनाथ खडसे नाराज असून ते पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खडसे हे शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडसे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

खडसेंच्या नाराजीवर भुजबळांची प्रतिक्रिया :
‘भाजपमध्ये ओबीसी नेते नाराज आहेत, त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या आरोपात तथ्य आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे ते त्या पक्षात गेले, असा त्याचा अर्थ होत नाही. एकनाथ खडसे हे अनुभवी नेते असल्याने ते योग्य निर्णय घेतील,’ अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर व्यक्त केली.

दरम्यान, २०१४ सत्तांतरानंतर भाजपमध्ये नेतृत्वावरून स्पर्धा सुरू झाली. एकनाथ खडसे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही खडसे यांना तिकीट नाकारण्यात आलं. दुसरीकडे मुलगी रोहिणी यांचा पराभव. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे यासगळ्या नात्यात खडसे कोणता निर्णय घेतात , हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like