एकनाथ खडसेंचा शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीस पाठिंबा ?

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन जुंपली असताना आता शिवसेनेची मुख्यमंत्रीपदासाठीची मागणी स्वाभाविक आहे, दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं असे सांगत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी शिर्डीत साई दरबारी आलेल्या खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासह पत्नी आणि मुलगी रोहिणी खडसे – खेवलकर या देखील उपस्थित होत्या.

काही दिवसांपासून भाजपच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपली मनातील खदखद बोलून दाखवली. खडसे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, सत्ता स्थापनेवरुन तसेच मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

खडसे म्हणाले की शिवसेना भाजपात मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा नाही. लोकसभेवेळी दोन्ही पक्षात काय ठरले याबाबत कल्पना नाही. मात्र शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक आहे, दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणं व्हायला हवे. राज्यात महायुतीचे सरकार येईल असे सांगायला मात्र ते विसरले नाहीत.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राजकारणापासून खडसे तसे दूरच राहिले. विधानसभेवेळी त्यांना तिकीट नाकारल्याने ते चर्चेत आले होते. परंतू नंतर त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. परंतू मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला.

Visit : Policenama.com