वेब सीरिज ‘A Suitable Boy’ वर लावला ‘लव्ह जिहाद’ पसरवण्याचा आरोप; भाजप नेत्याने दाखल केली ‘Netflix’ विरोधात तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिल्ममेकर मीरा नायरची वेब सीरिज ‘ए सुटेबल बॉय’ वर अनेक लोक लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी आरोप करत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रवाहित झालेल्या या वेब सीरिजमध्ये ईशान खट्टर आणि तब्बू यांच्यामध्ये रोमान्स दाखवला आहे. या मालिकेत ईशान मान कपूरची भूमिका साकारत आहे, तर तब्बू सईदा बाईच्या भूमिकेत आहे. या मालिकेत रणवीर शौरी हा वारसची भूमिका साकारत आहे, तर विजय वर्मा रशीदच्या भूमिकेत आहे.

मध्य प्रदेशच्या भाजप नेत्याने सीरिजमध्ये इंटररिलीजन प्रेम दर्शविण्याबाबत आक्षेप घेतला आहे. ते रीवा येथील भाजप युवा मोर्चाचे सदस्य आहेत आणि त्यांचे नाव गौरव तिवारी आहे. गौरव तिवारी यांनी नेटफ्लिक्स विरोधात रीवा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या मालिकेतून नेटफ्लिक्स लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गौरव तिवारी यांनीही नेटफ्लिक्सवर आरोप केला आहे की, या वेब सीरिजच्या माध्यमातून त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

याबाबत गौरव तिवारी यांनी सीरिजमधील अनेक सीन आणि पोलिसांच्या तक्रारी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. यासोबतच त्यांनी लोकांना त्यांच्या मोबाईलमधून नेटफ्लिक्स हटवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “राणी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर घाट शिवभक्तांना समर्पित केले. हजारो पाषाण शिवलिंग त्यांची ओळख आहे. परंतु नेटफ्लिक्स इंडिया या पवित्र भूमीचा उपयोग लव्ह-जिहाद प्रोत्साहन देण्यासाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी करते. मी आज माझ्या फोनवरून नेटफ्लिक्स हटवत आहे आणि तुम्ही? ”

मंदिरात चित्रित केले अश्लील दृश्ये
एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “मंदिराचे अंगण, बॅकग्राउंडमध्ये आरती आणि अश्लील दृश्य, अजानच्या वेळी मशिदीत शूट करण्यासाठी तुम्हाला ‘क्रिएटिव्ह फ्रीडम’ आहे का नेटफ्लिक्स इंडिया? हिंदूंच्या सहनशीलतेला त्यांची दुर्बलता समजू नका, हा केवळ मध्य प्रदेशाचा नाही तर भगवान शिव आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. माफी मागावी लागेल.”