bjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया (bjp leader gaurav bhatia) यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. (bjp leader gaurav bhatia targets rahul and sonia gandhi)

मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की इथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही. असं गौरव भाटिया बोलताना म्हणाले.

मोदी जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व

एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे. ते पुढे म्हणतात, पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातला आहे.”
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : bjp leader gaurav bhatia targets rahul and sonia gandhi

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’