काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूम बाहेर झोपावे : गिरीश महाजन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्पिरिंग होऊ शकते त्यामुळे ज्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत त्या परिसरातील मोबाईल टॉवरवर जॅमर बसवावेत. अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर काँग्रेस नेत्यांनी स्ट्राँग रूम बाहेर झोपावे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, काँग्रेसला जर निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर त्यांनी आपली टीम तयार करून स्ट्राँग रूम बाहेर पहारा द्यावा. पराभव दिसू लागल्याने काँग्रेस कारण शोधत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी एकही प्रशासकीय अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना संतप्त शेतकऱ्यांच्या संतापालाही सामोरे जावे लागले. यानंतर महाजन यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची फोनवर कानउघडणी केली.

काँग्रेसची काय आहे मागणी
ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत. त्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर जॅमर बसवण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होऊ शकते त्यामुळे या परिसरातील मोबाईल टॉवरवर निवडणूक आयोगाने जॅमर बसवावेत अशी मागणी त्यांनी पत्राकर परिषदेत केली आहे.

मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकते : अशोक चव्हाण

Loading...
You might also like